ताज्या बातम्या व अद्यतन 📢 गावातील प्रत्येक महत्त्वाची बातमी — एका ठिकाणी, एका क्लिकमध्ये
1️⃣ 📰 या विभागामध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व ताज्या बातम्या, घोषणा आणि कार्यक्रमांची माहिती दिली जाते.
2️⃣ 📅 येथे तुम्ही ग्रामसभा आणि विशेष उपक्रमांची अद्ययावत माहिती पाहू शकता.
3️⃣ 🏗️ आमचं उद्दिष्ट आहे की गावातील प्रत्येक नागरिकाला वेळोवेळी आणि पारदर्शक माहिती मिळावी.
4️⃣ 📢 सर्व घडामोडी नागरिकांच्या सहभागातून पारदर्शकपणे राबवल्या जातात — तुमचं सहकार्य आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
5️⃣ 🌿 नवीन माहिती नियमितपणे येथे प्रकाशित केली जाते, म्हणून हे पान वारंवार भेट द्या आणि गावाच्या प्रगतीशी जोडलेले राहा.
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत प्रचार प्रसिद्धी
मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत गावातील प्लास्टिक संकलन करणे
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (२०२५-२६) ग्रामविकास विभागातर्फे गावांमध्ये प्लास्टिक बंदी आणि संकलनावर विशेष भर देण्यात येत आहे. याद्वारे लोकसहभागातून प्लास्टिक कचरा संकलन केंद्रे, घरोघरी कचरा गोळा करणे, आणि प्लास्टिकमुक्त गाव घोषित करण्याचे उपक्रम राबवून आरोग्यदायी व शाश्वत गाव निर्मिती केली जात आहे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियान अंतर्गत आज दि.०४/०३/२०२६ रोजी ग्रामपंचायत संभाजीपूर येथे प्लास्टिक संकलन मोहीम सहायक गटविकास अधिकारी मा.मुकेश सजगाणे साहेब यांच्या उपस्थित आज संपन्न झाले
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत अनेमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे
अनेमियामुक्त गाव संकल्पना राबविणे – १५ ते ४९ वयोगटातील सर्व महिलांची आरोग्य तपासणी करून शंभर टक्के महिलांची अॅनिमिया मुक्त बाबत अंमलबजावणी करण्यासाठी. १५ ते ४९ वयोगटातील सर्व महिला तपासणी ग्रामपंचायतसंभाजीपूर या ठिकाणी आयोजित केली सदर उपक्रमासाठी गटविकासअधिकारी मा.श्री.विजयकुमार परीट साहेब तालुका वैद्यकीय अधिकारी मा.श्री.खटावकर साहेब ग्रामपंचायत अधिकारी श्री.अतुलकुमार कांबळे व उपकेंद्राकडील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक / सेविका व आशा स्वयंसेविका हे उपस्थित होते